You are here: Home » Blog » गौरव महाराष्ट्राचा – एक सृजनशील सांगीतिक अनुभव

गौरव महाराष्ट्राचा – एक सृजनशील सांगीतिक अनुभव

टेलेव्हिजन वरचा गाण्यांचा रियालिटी शो म्हणजे तीच ती ठराविक गाणी साचेबद्ध पद्धतीने ऐकायला मिळणार अशी एक सहज प्रतिक्रिया असते. ई टीव्ही मराठी च्या ‘गौरव महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमाबद्दल मात्र अशी प्रतिक्रिया देता येणार नाही.या कार्यक्रमातील गायक स्पर्धकांचा मार्गदर्शक म्हणून काम करताना, त्यांची गाणी बसवताना मला त्या गाण्यांमध्ये नवीन संगीत संयोजन करण्याची , योग्य वाटलं तर काही नवीन ओळी जोडण्याची मुभा आहे. त्यामुळे गाणी तीच असली तरी सादरीकरण मात्र त्या त्या गायकासाठी डिझाईन केलेलं , वादकांबरोबर नव्याने संगीतबद्ध केलेलं ऐकायला मिळेल.एक संगीतकार, कवी म्हणून मला विशेष मजा येतेय. माझ्या सर्व श्रोत्यांना आणि प्रेक्षकांनाही ही मजा येतेय असं ते कळवतायत.जरूर पहात रहा आणि कळवा.
गौरव महाराष्ट्राचा, ई टीव्ही मराठी वर. दर सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९:३० वाजता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>