You are here: Home » Blog » महाराष्ट्र शासनाचे मराठी चित्रपट पुरस्कार

महाराष्ट्र शासनाचे मराठी चित्रपट पुरस्कार

Milind Joshiगेल्या वर्षी ( २०१४ ) तयार झालेल्या मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्र शासना कडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कार परीक्षक मंडळाचा सदस्य होण्याचा मान मला नुकताच मिळाला.
संगीत क्षेत्रातल्या माझ्या एकूण कामगिरी वर शासनाने दाखवलेला विश्वास आनंद देऊन गेला. चित्रपटांची संख्या मोठी होती . काम जिकिरीचं होतं . चित्रपट तयार करण्यासाठी अनेक लोकांचे श्रम आणि मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च झालेला असतो. त्या चित्रपटाशी संबंधित प्रत्येकासाठी ते एक मोठं स्वप्न असतं. पण केवळ श्रम आणि पैसा या दोन गोष्टींनी चित्रपट तयार होऊ शकत नाही . त्यासाठी माध्यमाची जाण असणं अत्यावश्यक असतं . असो . अनेक प्रकारच्या चित्रपटांची चढाओढ आणि त्यातल्या जमून आलेल्या मोजक्यांना पुरस्कार , कौतुक हे नेहमीचच. या चित्रपटातल्या संगीताच्या बाजूची नोंद घेणं आणि परीक्षण करणं खूप जवाबदारी काम होतं . इतर मान्यवर परीक्षक सहकारी आणि विशेष परिनिरीक्षक यांच्या सहकार्यांनी एकूण नोंदी आणि निरीक्षणं नोंदवणं हा प्रवास फार छान झाला. या संधी बद्दल महाराष्ट्र शासनाचे मन:पूर्वक आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>