व्यावसायिक गायक बनायचं स्वप्न अनेक जणांचं असतं. पण त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला यायला हव्या याची माहिती नसल्यामुळे हे स्वप्न साकार करणं कठीण होऊन जातं. यासाठी आवश्यक असलेली माहिती मिळवून प्रत्यक्षात स्वत:ला पूर्ण पणे तयार करण्या साठी कार्यशाळांची मालिका आम्ही सुरु करत आहोत. विलेपार्ले (मुंबई) अणि पुणे अश्या दोन ठिकाणी गायकांसाठी कार्यशाळा घेतोय. या कार्यशाळेचा मूळ हेतू अनेक गाणी शिकवणं हा नसून, व्यवसायिक गायक होण्यासाठी गायनाचा नेमका अभ्यास कसा करायचा, काय पात्रता गायकात असली पाहिजे हे शिकवणं हा आहे. या संदर्भातली आणखी माहिती तुम्हाला या इमेज मध्ये आणि त्यात दिलेल्या फोन नंबर वर मिळेल. या कार्यशाळा रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये आयोजित केल्या आहेत. त्यामुळे जागा मर्यादित आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क- प्राची कोकीळ- 9850500262 आणि निलेश निरगुडकर – 9819031573 सहभागी व्हा