You are here: Home » Blog » गायकांसाठी कार्यशाळा घेत असताना

गायकांसाठी कार्यशाळा घेत असताना

माझे गुरुजी सुप्रसिध्द संगीतकार  पं.यशवंत देव यांच्याकडून अनेक वर्षे शिकत असताना आलेले अनुभव, ते इतरांना  शिकवत असताना घडलेले माझे निरीक्षण, आणि त्यांच्याकडून शिकलेल्या मार्गावर चालत मी केलेला स्वत:चा अभ्यास या सगळ्याचा परिपाक म्हणजे मी घेत असलेल्या गायकांच्या कार्यशाळा आहेत असं म्हणायला हवं. सुगम संगीताच्या  रियाजा बद्दलचा एखादा विचार आणि पद्धत शिकणाऱ्या गायकासमोर मांडली की त्याच्या मनात उमटू शकणाऱ्या प्रश्नांची पूर्वकल्पना आता मला असते. कारण असे प्रश्न माझ्याही मनात एक विद्यार्थी म्हणून  त्या त्या वेळी उमटून गेलेले आहेत. स्वानुभवावरून एक मात्र नक्की माहिती आहे की यातले बहुतांश प्रश्न नुसतेच विचारासाठी विचार या पध्दतीने उमटलेले असतात . सांगितलेली गोष्ट करून पाहण्या आधीच मनात  उमटलेल्या शंकांना ती गोष्ट प्रत्यक्ष करून पाहणं , अनुभव घेणं हेच एक उत्तर पुरेसं ठरू शकतं. स्वानुभवानंतरही त्या गोष्टी बद्दल आपलं काही म्हणणं असेल तर बऱ्याचदा ती गोष्ट आपल्या पिंडानुसार आपलीशी करून घेण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे असं लक्षात येतं. शेवटी शिकण्याच्या, प्रगती करण्याच्या प्रक्रीये मध्ये आपला स्वत:चा सक्रीय आणि सर्वसमावेशक सहभाग असणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपण कलाकार म्हणून ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीतून पुढल्या आणखी प्रगल्भ स्थितीत पोहोचण्या बद्दल एक आकर्षण असणं आणि त्या आकर्षणाला योग्य आणि नेमक्या प्रयत्नांची जोड देणं ही एका कलाकारासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. कार्यशाळेत शिकायला येणाऱ्या प्रत्येक गायकाशी संवाद साधत असताना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते.RIYAZ KARYASHALA logo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>